Home > Political > अमृता वहिनीसमोर फडणवीसांनी जोडले हात...

अमृता वहिनीसमोर फडणवीसांनी जोडले हात...

अमृता वहिनीसमोर फडणवीसांनी जोडले हात...
X

अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यांमुळे देवेंद्र फडणवीस अनेक वेळा पेचात पडले आहेत. कधी पुरणपोळी तर कधी रात्रीचे त्यांचे वेषांतर, असे अनेक विषय आहेत.. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस अशा वेगवेगळ्या विषयांमुळे कायमच चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना गाण्याची सुद्धा प्रचंड आवड आहे त्यांच्या गायनावरून तर त्यांना अनेक वेळा ट्रोल केलं गेलं आहे. पण ट्रोल केलं किंवा वाईट साईट मेसेज केले म्हणून त्यांनी कधी आपली ही आवड मारून टाकली नाही त्या अगदी बिनधास्त कसलाही विचार न करता त्यांना जसं हवं तसं जीवन जगत असतात. अमृता फडणवीस यांच्या याच बिंदास्त आणि स्ट्रेट फॉरवर्ड वागण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आता काही टिप्पणी केली आहे आणि याचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. इतकच काय देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्यासमोर थेट हात जोडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हात जोडण्याची वेळ का आली?

मागच्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस एका टीव्ही कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांना अमृता फडणवीस यांच्या विषयी काही प्रश्न विचारले. “अमृता वहिनी अगदी बेधडक मत मांडतात, कृती करतात. राजकारणात असं फार कमी वेळा दिसतं. एकमेकांना स्पेस दिल्यामुळे तुमची जोडी अगदी अनुरुप वाटते. स्पेस देणं, एकमेकाना समजून घेणं हे तुम्ही कसं काय जमवलं”, असा प्रश्न विचारण्यात आला.. या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस यांनी अगदी मनातलं बोलून टाकलं ते म्हणाले, ''पहिल्या दिवशीपासूनच आमचं एग्रीमेंट होतं की तिने तिचे जीवन जगायचं आणि मी माझं जीवन जगायचं. व्यक्ती म्हणून तिची काही मते आहेत जी मला पटतात असं नाही. मला अनेक मतं पटत नाहीत, अनेक कृती देखील मला तिची पटत नाही पण तो तिचा अधिकार आहे. तिला जर इतकं स्ट्रेट फॉरवर्ड राहायचं असेल तर हा त्रास सहन करावा लागेल कारण अजूनही आपल्या समाजामध्ये आपण कितीही पुढारलेले-पुढारलेले सांगितलं तरी महिलांनी इतकी मोकळी मांडणं हे फार काही पचत नाही. राजकारण्यांना तर बिलकुलच पचत नाही. पण मी निश्चितपणे सांगतो की तिची मतं मला पटत नाहीत पण ती मत मांडण्याचा तिला अधिकार आहे. आणि मी तो कधीच फिरवून घेणार नाही..

आपल्या समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बराच वेगळा आहे. एखादी महिला काही वेगळं करते म्हटलं तर तिचे पाय खेचण्यासाठी अनेकजण तयार असतात. त्यातल्या त्यात पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांनी काहीतरी करणं आणि त्याला विरोध न होणं हे फार क्वचित घडतं. पण आता हळूहळू बदल घडू लागला आहे. महिला बोलू लागल्या आहेत, शिकू लागल्या आहेत आणि आपलं मत बिनधास्तपणे व्यक्त करू लागल्या आहेत. आज पर्यंत मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हटलं की साडी, डोक्यावर पदर असच अनेक वेळा आपण पाहिले आहे. पण या सगळ्याला अमृता फडणवीस यांनी फाटा दिला आहे. त्या त्यांचं जीवन त्यांना जसं हवं तसं जगत असतात. यावरून त्यांना समाज माध्यमांवर अनेक वेळा ट्रोल केलं गेलं आहे. पण याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या कार्यक्रमात जे सांगितलं त्यावरून स्त्रियांच्या प्रती त्यांची देखील काय भावना आहे हे देखील आपल्याला समजलंच आहे.. बाकी अमृता फडणवीस यांच्या विषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...

Updated : 23 July 2023 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top