Home > Political > 'राजकारण्यांनो लाजा बाळगा'

'राजकारण्यांनो लाजा बाळगा'

राजकारण्यांनो लाजा बाळगा
X

महाराष्ट्रातील राजकारण्यांनो लाजा बाळगा असं म्हणण्याची वेळ आज आली आहे. एरव्ही राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या नावाची दाखले देऊन महाराष्ट्र किती पुरोगामी वैगरे आहे. असं सांगायचं. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा निवडणूकीत महिलांना सत्तेत वाटा द्यायची वेळ येते तेव्हा राजकीय पक्षाचं पुरोगामीत्व कुठं जातं.

खासकरून महाविकास आघाडी सरकार तर सातत्याने फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचं जप करत असतं. मात्र, प्रत्यक्ष कृतीत कुठंच दिसून येत नाही. भाजपने औषधाला एका महिलेला कमीत कमी मैदानात उतरवलं तरी आहे. महाविकास आघाडीकडून एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही.

आज राज्यात 10 विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत आहे.

विधानपरिषद निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा चुरशीचा सामना रंगणार आहे.विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पूरेसं संख्याबळ नाही.

राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही देवेंद्र फडणीस यांनी अपक्षांच्या जोरावर बाजी मारली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पराभव करून त्यांनी तिसरा उमेदवार जिंकून आणला. हा करिश्मा फडणवीस विधानपरिषदेत करू शकता का?

कोणाकडे किती संख्याबळ? भाजपचं पारडं जड का महाविकास आघाडीचं?

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण?

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी यांना तिकीट दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवलं आहे.

काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या दोन वरिष्ठ नेत्यांना पुन्हा संधी दिलीये.

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार कोण?

भाजपने विधानपरिषदेत पाच उमेदवारांना संधी दिलीय. तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली.

भाजपने विधान परिषदेचे विरोधपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना निवडणुकीचं तिकीट दिलंय.

महाविकास आघाडीकडे किती संख्याबळ?

राज्यसभा निवडणुकांनतर अवघ्या 10 दिवसांत विधानपरिषदेची निवडणूक होतेय. त्यामुळे ही लढत अत्यंत अटी-तटीची मानली जातेय.

महाविकास आघाडीतील पक्षांचं एकूण संख्याबळ आहे 152.

शिवसेना- 55

राष्ट्रवादी काँग्रेस- 53

काँग्रेस- 44

विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सहा उमेदवार जिंकवण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज भासणार आहे.

Updated : 20 Jun 2022 10:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top