Latest News
Home > Political > मोदींचे मंत्री निघाले 'कोरोना'चा आशीर्वाद द्यायला

मोदींचे मंत्री निघाले 'कोरोना'चा आशीर्वाद द्यायला

मोदींचे मंत्री निघाले कोरोनाचा आशीर्वाद द्यायला
X

नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या मंत्र्यांनी आपापल्या भागात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. मात्र या यात्रेत्र कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहे. तिसरी लाटेची शक्यता वर्तवली जात असताना हजारोंच्या गर्दीत काढलेली ही यात्रा कोरोनाचा प्रसार करणारी ठरू शकते मात्र, असे असताना सुद्धा यात्रा काढली गेली, विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार सुद्धा या यात्रेत्र सहभागी झाल्या आहेत.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील परीस्थिती पाहून सुद्धा राजकीय नेते काही धडा घायला तयार नाहीत. तर रोज उटसुठ लोकांना कोरोनाच्या नियमांची आठवण करून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंत्री सुद्धा काही मागे नाहीत, एवढच कशाला देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांची आशीर्वाद यात्रा सर्व नियम पायी तुडवत सुरु आहे.फक्त भारती पवारच नाही तर नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालेल्या सर्वच मंत्र्यांनी आपापल्या भागात आशीर्वाद यात्रा काढल्या आहेत.त्यामुळे मोदींचे मंत्री 'कोरोना'चा आशीर्वाद द्यायला तर निघाले नाहीत ना? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची आशीर्वाद यात्रेत ना सोशल डीस्टेन्स ना लोकांना मास्क लावला होता. एवढच कशाला खुद्द केंद्रीय मंत्र्यांना मास्क कसा घालावा हे माहित नसल्याचं दिसून आले.

अर्थमंत्री सोडा देशाच्या देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सुद्धा मागे नाहीत. आपली आशीर्वाद यात्रा घेऊन पालघरात गेलेल्या भारती पवारांनी कोरोनाचे सर्व नियम पायी तुडवत आपली यात्रा पुढे नेली. स्वता मास्क घातलेल्या पवार यांच्या यात्रेत गर्दी एवढी की लोकांना पाय ठेवायाला जागा नाही. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच संकट येण्याची शक्यता असताना हजारोंच्या गर्दीत अशा आशीर्वाद यात्रा काढणे कितपत योग्य असेल असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

देशात आणि राज्यात डेटा प्लसचे रुग्ण आढळून येत आहेत, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान लोकांना अजूनही संकट टळले नसल्याचे सांगत आहे, मात्र असं असताना राजकीय नेते आणि मंत्री काही आयकायला तयार नाहीत. रस्यावर सर्वसामन्यांकडून कोरोनाचे नियम तोडले म्हणून रोज लाखो रुपयांचे दंड वसूल केले जात आहे. मात्र, कोरोनाचे नियम तोडण्यासाठी राजकीय नेते लाखो रुपये खर्च करून कार्यक्रम भरवतायात, त्यामुळे 'लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडा पाषाण' अशी अवस्था राजकीय पक्षांची झाली आहे. दुसऱ्या लाटेत लोकं ऑक्सिजन अभावी मरत होती, तिसरी लाट यापेक्षा अधिक भयंकर असणार असल्याचं अभ्यासक सांगतायत, अशावेळी मोठ्या राजकीय नेत्यांना त्यांच्या सोयी नुसार उपचार सुद्धा मिळून जातील पण आज त्यांच्या मागे जीव धोक्यात घालून झेंडे घेऊन फिरणाऱ्यांच काय?...

Updated : 18 Aug 2021 4:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top