Top
Home > Political > वर्षा संजय राऊत 5 जानेवारीला हाजीर हो ईडीने पुन्हा धाडले समन्स

'वर्षा संजय राऊत 5 जानेवारीला हाजीर हो' ईडीने पुन्हा धाडले समन्स

वर्षा संजय राऊत 5 जानेवारीला हाजीर हो ईडीने पुन्हा धाडले समन्स
X

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पुन्हा समन्स बजावलेत. या नवीन समन्सप्रमाणे 5 जानेवारीला वर्षा राऊत यांना ईडीच्या कार्यालयात हजेर व्हावं लागणार आहे. डी मार्फत वर्षा राऊत यांना आज नव्याने समन्स बजावण्यात आले आहे.

वर्षा राऊत यांना ईडीने यापूर्वी समन्स बजावले होते आणि २९ डिसेंबर रोजी अर्थात आजच चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राऊत यांनी ईडीकडे थोडा वेळ मागितला होता. त्यांची ही विनंती स्विकारत ईडीने पुन्हा नव्याने समन्स पाठवत ५ जानेवारी पूर्वी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले.

प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. त्यासाठीच ED कडून वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

वर्षा राऊत यांनी EDला पत्र पाठवून चौकशीला अधिकचा वेळ मागून घेतल्याची बातमी समोर आली होती.

Updated : 30 Dec 2020 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top