Home > Political > VIDEO : मिसेस मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंचं असं केलं स्वागत..

VIDEO : मिसेस मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंचं असं केलं स्वागत..

VIDEO : मिसेस मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंचं असं केलं स्वागत..
X

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे काल ठाण्यात आले ठाण्यात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मागच्या पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे नॉटरिचेबल अशी एक बातमी आली आणि त्यानंतर आज पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय प्रसंग पाहण्यास मिळाले. या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. हे सगळं करण्यासाठी एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार पहिला मुंबईहून सुरतला तिथून थेट गुहाटीला गेले. इथेच हा प्रवास थांबला नाही तर गुवाहाटी वरून ते गोव्याला आले आणि मग मुंबईत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र मुंबईत येऊन देखील त्यांना ठाण्यात जात आलं नाही. तिथून ते पुन्हा गोव्याला गेले. आणि आपल्या सोबत असलेल्या सर्व आमदारांसह पुन्हा मुंबईत आले. मुंबईतलं दोन दिवसाचं अधिवेशन संपलं. बहुमत चाचणीत शिंदे-फडणवीस सरकार पास झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे काल ठाण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या ठाण्यात आल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले.

ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात स्वागत सुरू असताना सर्वात चर्चा होती ती म्हणजे मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे यांची. लता शिंदे यांचा आनंद गगनात नमावणारा होता. त्यांनी स्वतः हातामध्ये ढोल, ताशे घेत ते वाजवत पती एकनाथ शिंदे यांचे स्वागत केलं. लता शिंदे या स्वतः ढोल-ताशे वाजवत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर देखील प्रचंड व्हायरल होतो आहे.



Updated : 5 July 2022 1:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top