Home > Political > लोकं काहीही बोलतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी केला बंदोबस्त..

लोकं काहीही बोलतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी केला बंदोबस्त..

लोकं काहीही बोलतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी केला बंदोबस्त..
X

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर भाजपच्या पाठींब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर अखेर एकनाथ शिंदे नेटकऱ्यांना घाबरल्याचे समोर आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर राज्यात अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरून कमेंटचा ऑप्शन बंद केल्याचे आढळून आले आहे.




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे डॅशिंग मंत्री म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांना शिवसैनिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार म्हणून टीका केली जात होती. तसेच त्यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्येही नेटकरी संताप व्यक्त करत होते. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या फेसबुकवरचा कमेंट हा ऑप्शन बंद करून ठेवला आहे.







Updated : 4 July 2022 3:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top