Home > Political > भाजपाचा मोठा फायदा एकनाथ शिंदे गटाला झाला - आ. उमा खापरे

भाजपाचा मोठा फायदा एकनाथ शिंदे गटाला झाला - आ. उमा खापरे

भाजपाचा मोठा फायदा एकनाथ शिंदे गटाला झाला - आ. उमा खापरे
X

विधानसभेच्या नवयुक्त आमदार उमा खापरे यांनी माध्यमांची बोलताना सांगितली की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वावरती महाराष्ट्र ने विश्वास दाखवला असून महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपा हा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. याचा मोठा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामुळे भाजप शिवसेनेची पुन्हा एकदा युती झाली असून याचा फायदा येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये ही मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे आमदार उमा खापरे यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

भाजपाचा मोठा फायदा एकनाथ शिंदे गटालाही झाला असून त्यामुळे त्यांचा पक्ष दोन क्रमांकावरती राहिला असून यामुळे भाजप युतीला मोठे महत्त्व प्राप्त झाले. इतकाच नाही तर उद्धव ठाकरे गटाला नागरिकांनी नाकारल्याची चित्र दिसून आले आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये सेना-भाजप युतीचा फायदा शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपाला मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे वक्तव्य त्यांनी माध्यमांची बोलताना केले आहे.
Updated : 7 Aug 2022 1:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top