Home > Political > रक्षा ताई भाजपमध्येच...

रक्षा ताई भाजपमध्येच...

शुक्रवारी एकनाथ खडसे आणि कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र खासदार रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणार आहेत.

रक्षा ताई भाजपमध्येच...
X

मागील काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पण या प्रवेशात त्यांच्या सोबत भाजपच्या तिकीटावर खासदार झालेल्या रक्षा खडसे या सुध्दा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? या वर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "पक्ष सोडायचा की नाही ते त्यांचं वैयक्तीक मत आहे. सध्यातरी मी आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत." असं म्हटलं आहे.

दरम्यान, खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच खासदार रक्षा खडसे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

Updated : 21 Oct 2020 6:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top