Home > Political > शिंदेंच्या मागे कुणाची ताकद? - एकनाथ खडसे

शिंदेंच्या मागे कुणाची ताकद? - एकनाथ खडसे

एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे कोणती तरी मोठी शक्ती आहे त्यामुळे हे सगळ घडतंय असं म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय ते इतकं धाडस करणार नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हंटल आहे.

शिंदेंच्या मागे कुणाची ताकद? - एकनाथ खडसे
X

सध्या राज्यात जे राजकारण चालले आहे हे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे दिसत असले तरी या मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळ घडतंय अस म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याण मध्ये केलं आहे. कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खानदेश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

या सत्काराच्या कार्यक्रमादरम्यान एकनाथ खडसे यांनी माझ्या मागे जी शक्ती आहे जी ताकद आहे ती तुमची आहे. मला सर्वोच्च स्थानापर्यंत पोचविण्याचे काम तुम्ही केलं आहे. मी राज्याचा आमदार आहे कधी ही मला बोलवा मी येईन. यावेळी बोलताना त्यांनी प्रमाणिकपने काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ,जमिनीचे आरोप झाले, इतकं छळलय हे सांगण्यासाठी मी इथे उभा नाही. मात्र राजकारण इतक्या खालच्या स्तराला जातं हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलय. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होत नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला. माझा जावयी माझ्या दोन्ही मुली माझी पत्नी यांच्या मागे चौकशी लावली. सगळ कुटुंब आठवड्याला ED कार्यालयात बसत होते . मी काय गुन्हा केलाय कुठे पैसे खाल्ले, काय घेतलं तुम्ही दाखवा ना? असा भावनिक सवाल त्यांनी यावेळी केला.

यापुढे बोलताना मागच्या आठवड्यात माझ्या खात्यातले पैसे काढून टाकले. एक रुपया ठेवला नाही. पहिले खाते बंद केलं आता पैसे काढून टाकले त्यानंतर राहते घरं १० दिवसात खाली करण्याची नोटीस आली. नाथा भाऊने काय गुन्हा केला? न्यायालयातून जावून स्टे आणला म्हणून त्या घरात राहतोय. असं खालच्या स्तराचं राजकारण अनुभवलं नव्हतं. अस करायचं असतं तर अनेकांना मला छळता आलं असतं. माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो दुर्दैवाने असा विचार मी करत नाही. दुसऱ्यांना सहकार्याची भूमिका असते. न्यायालयाने संरक्षण दिलं म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहोत. नाही तर संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतो. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली नाहीतर नाथाभाऊ होत्याच नव्हता झाला असता. असं देखील ते म्हणाले.

Updated : 27 Jun 2022 6:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top