Home > Political > "नवनीत राणांनी आधी स्वतःची ताकद निर्माण करावी मग.." एकनाथ खडसेंची टीका

"नवनीत राणांनी आधी स्वतःची ताकद निर्माण करावी मग.." एकनाथ खडसेंची टीका

नवनीत राणांनी आधी स्वतःची ताकद निर्माण करावी मग.. एकनाथ खडसेंची टीका
X

मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ही दोन नावं चर्चेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. आणि त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलंच तापले आहे. याच तापलेल्या राजकारणात नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यानंतर त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं.

या सगळ्या प्रकारानंतर त्यांना चौदा दिवसांची कोठडी झाली आणि त्यांना नुकताच कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आता जामीन मंजूर झाल्यानंतर देखील त्यांची चर्चा काही कमी झालेली नाही. करण जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं आणि त्याच रुग्णालयात या कक्षात त्यांनी काढलेले फोटो सध्या समाज माध्यमांवर बाहेर झाले आणि त्यानंतर यावरून MRI कक्षात फोटो कसे काय म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे. या सगळ्यावर आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे. नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या व शरद पवारांच्या टेकुमुळे निवडून आलेले आहेत. त्यांनी स्वतःची ताकद आधी निर्माण करावी आणि मग मुख्यमंत्र्यांशी निवडणूक लढवावी असं म्हणत टीका केली आहे.

Updated : 9 May 2022 2:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top