Home > Political > धक्कादायक ; अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार

धक्कादायक ; अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार

धक्कादायक ; अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार
X

उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून गेली अनेक दिवस हा शिक्षक या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. यात ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिली. स्कुटिवर प्रवास करत असताना मुलीला रक्तस्रावाचा त्रास झाला घरच्यांनी तिला उपचारासाठी उस्मानाबाद येथील महिला रुग्णालयात दाखल केले असता मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले.

त्यातून हा प्रकार उघडकीस आला. स्वतः मुलीनेच या नराधम शिक्षकाविरोधात जबाब दिला व या जबाबनुसार कळंब पोलिसात या नराधम शिक्षका विरोधात पोक्सो व बलात्कार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला. असून आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आलीय. दरम्यान कळंब शहरात अनेक खेडेगावातील मुली शिक्षणासाठी येत असतात. शिक्षकानेच हे कृत्य केल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




Updated : 7 July 2022 1:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top