Home > Political > "आम्हाला घर नको आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांची घरं वाचवा" मेघना बोर्डीकर यांचं आवाहन

"आम्हाला घर नको आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांची घरं वाचवा" मेघना बोर्डीकर यांचं आवाहन

आम्हाला घर नको आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांची घरं वाचवा  मेघना बोर्डीकर  यांचं आवाहन
X

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आम्हाला घर नको आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांची घरं वाचवा" आमदार मेघना बोर्डीकर यांचा आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची ३०० घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. त्यानंतर त्यांच्या निर्णयावर सर्वच स्तरांतून जोरदार टीका सुरू झाली. अनेक आमदारांनी सुद्धा या निर्णयावर टीका करतं ही घरं घेण्यास नकार दिला. याच निर्णयावरून भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी स्वीट करून, "मला घर नको अन्नदात्या शेतकऱ्यांची घर वाचवा" थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबईतील आमदार वगळता इतर सर्वपक्षीय आमदारांना गोरेगाव येथे म्हाडाची ३०० घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली. मुंबईबाहेरील आमदारांना मुंबईत घरे मिळत नसल्याच्या व त्यांना भाडेही परवडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.पण सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्या लोकांसोबत आमदारांमध्ये देखील संताप पाहायला मिळत आहे, या निर्णयावरून सोशल मीडियावर लोकं आपली संतापजनक प्रतिक्रिया देत आहे.

Updated : 26 March 2022 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top