Home > Political > देवेंद्र फडणवीस आता आसाम दौरा करणार का ?

देवेंद्र फडणवीस आता आसाम दौरा करणार का ?

देवेंद्र फडणवीस आता आसाम दौरा करणार का ?
X

सध्या झी मराठीवर सुरू असणारा अभिनेता सुबोध भावे यांच्या "बस बाई बस" ह्या कार्यक्रमाचा प्रोमो प्रसारित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम महिलांसाठी विशेष असतो त्यामुळे पूर्ण हटके असा हा कार्यक्रम आहे. या मध्ये राजकिय, सामाजिक, कलाक्षेत्रातील महिलांना संधी दिली जातेयं. या शो मध्ये त्या दिल खुलास गप्पा मारत असतात. गेल्या एपिसोड मध्ये राष्टवादीच्या खासदार सुप्रियासुळे आल्या होत्या. आणि आता येणाऱ्या एपिसोड मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस येणार आहेत.दरम्यान या कार्यक्रमात आता अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. त्यांनी यावेळी मनमोकळा संवाद साधला. त्यांना मंचावर एक प्रश्न विचारण्यात आला. देवेद्रजीना माननीय मुख्यमंत्री म्हणजे "मामु" म्हणतात आणि तुम्हाला "मामी" म्हणतात तर तुम्हाला कस वाटतं ? त्यावर अमृताने स्मित हास्य देत 'अरे फारच मज्जा येते मला'. अस उत्तर दिलं. यावेळी त्यांना स्टेजवर देवेंद्रजीचा फोटो दाखवण्यात आला. त्यावर अमृता म्हणाल्या "काय बाकी आज वेळ मिळाला वाटत, कुठे आसामला नेताय का?" अस बोलल्या नंतर एकंदरी मंचावर हास्य कल्होळ पहायला मिळाला परंतु या संपुर्ण कार्यक्रमात काय होणार आहे. अमृता-देवेद्र आसाम ला जातील का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला ५ ऑगस्टला रात्री ९:३० वाजता पहायला मिळतील.

Updated : 2022-08-03T13:42:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top