Home > Political > "माझा तुला पुर्ण पाठिंबा आहे दिशा" – अभिनेता सिध्दार्थ

"माझा तुला पुर्ण पाठिंबा आहे दिशा" – अभिनेता सिध्दार्थ

"जर आंदोलक चर्चमध्ये जमले तर ते ख्रिश्चन धर्मप्रचारक होतात. त्यांनी बिर्याणी खाल्ली तर ते जिहादी होतात. पगडी बांधली तर ते खलिस्तानी होतात. आणि त्यांनी स्वत:चे आंदोलन स्वत: उभारले तर हे टूलकिट.. या फॅसिस्ट सरकारबद्दल आपण काही बोलू शकत नाही. #निषेध" असं देखील सिध्दार्थने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

माझा तुला पुर्ण पाठिंबा आहे दिशा – अभिनेता सिध्दार्थ
X

शेतकरी आंदोलनासंदर्भात ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी यांना अटक केल्याने दिशाच्या समर्थनात आता अभिनेता सिध्दार्थ पुढे आला आहे. "माझा तुला पुर्ण पाठिंबा आहे दिशा" असं सिध्दार्थने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सध्या दिशाला विवीध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. प्रियंका गांधी, पी चिदंबरम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. यात रंगदे बसंती फेम अभिनेता सिध्दार्थने देखील ट्वीट करत आपला पाठांबा दिला आहे. सुरुवातीला दिशा रवीला अटकेची बातमी रिट्वीटकरत सिध्दार्थ ने तब्बल 6 ट्वीट केली आहेत.

पहिल्या ट्वीटमध्ये सिध्दार्थने टूलकिट म्हणजे काय हे सांगीतलं आहे. सिध्दार्थ म्हणतो "तुम्ही जेव्हा तुमच्या मित्र मैत्रीणींसोबत एखादा चित्रपट पाहायला जाता तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना एक मेसेज पाठवता यात आपण कोणता चित्रपट पाहणार आहोत? कुठं भेटायचं आहे? किती वाजता भेटायचं आहे? या संर्भातील सर्व माहिती दिलेली असते यालाच टूलकिट म्हणतात. आणि जे आयटी सेल प्रसारित करतं ती याची कुरूप आवृत्ती आहे. ही नौटंकी थांबवा #ShameOnDelhiPolice"

"दिल्ली पोलीसही निर्दयी सरकारचं ऐकतात याचं मला आश्चर्य वाटतं. मी याचा खुप विचार करतो. मला खेद आहे दिशा हे सर्व तुझ्या सोबत होतय. मी तुझ्या सोबत आहे. तु अशीच खंबीर रहा. हा अन्याय देखील लवकरच संपेल."

"जर आंदोलक चर्चमध्ये जमले तर ते ख्रिश्चन धर्मप्रचारक होतात. त्यांनी बिर्याणी खाल्ली तर ते जिहादी होतात. पगडी बांधली तर ते खलिस्तानी होतात. आणि त्यांनी स्वत:चे आंदोलन स्वत: उभारले तर हे टूलकिट.. या फॅसिस्ट सरकारबद्दल आपण काही बोलू शकत नाही. #निषेध" असं देखील सिध्दार्थने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.Updated : 2021-02-16T14:33:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top