- चित्रा वाघ यांचा भाजपने वापर करून घेतला का?
- यूएस कॉन्सुल जनरल म्हणून माईक हॅन्की मुंबईत रुजू
- अपक्ष व शिंदे गटात नाराजी?
- Lawasa Case : सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटूंबियांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका..
- मंत्रिमंडळात कोणत्या महिलांचा होणार समावेश..
- ''शिंदे-फडणवीसांच्या आया-बहिणी..'' रुपाली ठोंबरे भडकल्या
- मिर्ले धनगरवाडी घटनेवर चिमुरडीने लिहील होतं पंतप्रधानांना पत्र
- ''संजय राऊत व शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते'' प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट
- देश २०१४ ला स्वातंत्र्य झाला मग अमृत महोत्सव कोणता..?- अमोल मिटकरी
- तेजस ठाकरे शिवसेनेचा नवा चेहरा ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

नीलम गोऱ्हे यांचा आशिष शेलार यांच्यावर पलटवार
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आशिष शेलार यांच्या प्रश्नांना देत त्यांच्यावर जोरदार टीका केली. शेलार यांनी मदत करणाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा गुजरातमध्येच आपली कृपादृष्टी करणाऱ्या प्रधानमंत्री यांच्याकडून केंद्रामार्फत मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावा असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
X
धुळे // भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नसून मी मदत देणारा मुख्यमंत्री आहे, यावर टीका करत मुख्यमंत्र्यांनी विना पंचनामा करता पूरग्रस्त भागात मदतीचे पॅकेज का दिले असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर नीलम गोऱ्हे यांनी उत्तर देताना सांगितले की, केंद्र सरकारचे गुजरात वर जास्त प्रेम आहे. गुजरात सरकारला न मागता 1 हजार कोटी रुपये दिले, मात्र महाराष्ट्र सरकारला काहीच नाही. म्हणजे आपल ते बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट असं म्हणत गोऱ्हे यांनी शेलार यांच्यावर सनसनीत टीका केली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोना संदर्भातील आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये नीलम गोऱ्हे बोलत होत्या.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मदत करणाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा गुजरातमध्येच आपली कृपादृष्टी करणाऱ्या प्रधानमंत्री यांच्याकडून केंद्रामार्फत मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावा असा टोलाही गोऱ्हे यांनी शेलार यांना लगावला.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी धुळे जिल्ह्यातील कोरोना मुक्त गावांचा आढावा घेतला. त्यांनी धुळ्यातील जी गाव कोरोना मुक्त झाली आहेत, त्या गावतील नागरिकांच्या अँटीबॉडीज चेक करून त्यावरून तेथील नागरिकांनी डोस घेतले आहेत की नाही तसेच त्यांच्या शरीरात असलेल्या अँटीबॉडीजवरून अंदाज घेत त्यांना पुन्हा येणाऱ्या लाटेत कोरोना होण्याच्या शक्यता असल्यास त्यावर तात्काळ उपाय योजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास दिले आहेत.