Home > Political > "मेलेल्या आईचे दूध पिऊन सत्तेत गेलात का?" शिवसेना नेत्या बंडखोर आमदारांवर भडकल्या..

"मेलेल्या आईचे दूध पिऊन सत्तेत गेलात का?" शिवसेना नेत्या बंडखोर आमदारांवर भडकल्या..

मेलेल्या आईचे दूध पिऊन सत्तेत गेलात का? शिवसेना नेत्या बंडखोर आमदारांवर भडकल्या..
X

राज्यात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर किरीट सोमय्या यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्यातील मुख्यमंत्र्यांचं माफिया राज्य संपल्याने नव्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असं किरीट सोमय्या म्हणाले. ठाकरे यांच्यावर केलेल्या या टीकेनंतर आता शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी किरीट सोमय्या यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट करत शिवसेनेच्या आमदारांना ''तुम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिऊन सत्तेत गेलात का? उद्धव साहेबांचा विरोध चिरीत तोमय्या बोलणार आणि तुम्ही ऐकून घेणार?'' अशा शिवसैनिकांना आव्हान करत थेट किरीट सोमय्या यांनाच इशारा दिला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली. त्यांच्या या टिके नंतर दिपाली सय्यद यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, शिवसेनेच्या आमदारांनो तुम्ही काय मेलेल्या आईचे दुध पिऊन सत्तेत गेलात का? उद्धव साहेबां विरोधात चिरीट तोम्मया बोलणार आणि तुम्ही ऐकुन घेणार हिच का शिवसेना तुमच्या रक्तात भिनली आहे? पहिले चिरीटला तुमच्या पंक्तीतुन बाहेर काढा नंतर शिवसैनिक नाव लावा.

Updated : 7 July 2022 3:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top