Home > Political > ''राजसाहेब लवकर बरे व्हा, फडणवीस साहेब एकटे पडतील" दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

''राजसाहेब लवकर बरे व्हा, फडणवीस साहेब एकटे पडतील" दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

राजसाहेब लवकर बरे व्हा, फडणवीस साहेब एकटे पडतील दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. हिप बोनच्या शस्त्रक्रियेसाठी ते मुंबईमधील लीलावती रुग्णालयात आहेत. राज ठाकरे यांच्यावर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेवरून शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एक Twit केले आहे. त्यात Twit मध्ये त्यांनी म्हटले आहे की, माननीय राज साहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील भोंगे अजून अर्धवट आहे.

आज विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत या पार्श्वभूमीवर दीपाली सय्यद यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वरती हा टोला लगावला आहे. दीपाली सय्यद या वारंवार त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत राहतात याआधीही त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या त्यानंतर त्यांनी आता पुन्हा राज ठाकरे यांना टार्गेट केले आहे.

Updated : 20 Jun 2022 8:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top