Home > Political > " चिरीट तोम्मया.." दीपाली सय्यद यांची जीभ घसरली

" चिरीट तोम्मया.." दीपाली सय्यद यांची जीभ घसरली

"शिवसेना तैयार है चिरीट तोम्मया . तेरे बस कि बात नही बाप को भेज" असं म्हणत म्हणत शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांची किरीट सोमय्यांवर टीका..

 चिरीट तोम्मया.. दीपाली सय्यद यांची जीभ घसरली
X

शिवसेना तैयार है चिरीट तोम्मया . तेरे बस कि बात नही बाप को भेज अस म्हणत शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी किरीट सोमय्यांवर पुन्हा शाब्दिक हल्लाबोल केला आहे. दीपाली सय्यद या नेहमीच त्यांच्या वक्तव्यवरून चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी बद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त निधनानंतर त्यांनी आता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या यांनी काल मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांच्या मुरुड तालुक्यातील कोर्लई गावातील नऊ एकर जमिनीवरील कथित १९ बंगल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आल्याचं म्हंटल आहे. या प्रकरणात खरी वस्तुस्थिती न्यायलयामार्फत जनतेसमोर येईल, असा दावा साेमय्यांनी केला आहे. त्यानंतर दीपाली सय्यद यांनी ट्विट करत किरीट सोमय्यांना आव्हान दिले आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटल आहे की, "शिवसेना तैयार है चिरीट तोम्मया . तेरे बस कि बात नही बाप को भेज"

Updated : 5 May 2022 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top