Home > Political > गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण राष्ट्रवादीच्या वाटेवर.

गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण राष्ट्रवादीच्या वाटेवर.

गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण राष्ट्रवादीच्या वाटेवर.
X

गणेश नाईक यांच्यावर आरोप करणार्‍या दीपा चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात नवी मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष डॉ. प्राजक्ता मोडकर यांना पत्र लिहीत त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या दिपा चौहान यांनी नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्षा प्राजक्ता मोडकर यांना पत्र लिहून आपल्याला पक्षात काम करण्याची संधी मिळण्या बाबत विनंती केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहारा घेत गणेश नाईकांना आणखीन अडचणीत करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.

दीपा चव्हाण यांनी जे पत्र लिहिले आहे त्या पत्रामध्ये काय म्हटले आहे ते पाहूयात, "मी दीपा चव्हाण गेली तीस वर्षापासून नवी मुंबई मध्ये वास्तव्यास आहे. माजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीमध्ये काम करण्याची इच्छा आहे. तरी मला योग्य ते पद देऊन काम करण्याची संधी द्यावी अशी नम्र विनंती.

Updated : 29 April 2022 2:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top