Home > Political > Budget 2020 : लता मंगेशकर संगीत विद्यालय उभारणार ; विद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद

Budget 2020 : लता मंगेशकर संगीत विद्यालय उभारणार ; विद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद

Budget 2020 : लता मंगेशकर संगीत विद्यालय उभारणार ; विद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद
X

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाचा वाद पेटला होता. पण आता राज्य सरकारने लता मंगेशकर यांचे संगीत विद्यालयरुपी स्मारक उभाऱण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या बजेटमध्ये याबाबतची मोठी घोषणा करण्यात आली.

लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन केले जाणार आहे. या संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. याचबरोबर राज्यातील महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांसाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्री अजित पवारांनी यांनी केली.

लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर त्याच जागेवर लता मंगेशकर य़ांचे स्मारक बांधले जावे, अशी मागणी भाजप आणि काँग्रेसने केली होती. पण लता मंगेशकर यांचे स्मारक हे त्यांच्या सांगितीक कारकिर्दीला सलाम करणारे असले पाहिजे असे मत व्यक्त करत अनेकांनी शिवाजी पार्कवर स्मारक कऱण्यास विरोध केला होता. तसेच लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत विद्यालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती, अखेर सरकारने कलिना येथे मुंबई विद्यापीठाच्या परिसरात या विद्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला होता. आता या विद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Updated : 11 March 2022 10:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top