Home > Political > काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याने घातला महिलांना गंडा, शिवसेनेच्या महिला आघाडीने केली धुलाई

काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याने घातला महिलांना गंडा, शिवसेनेच्या महिला आघाडीने केली धुलाई

मुद्रा लोनच्या नावाखाली कॉंग्रेसच्या महिल्या पदाधिकाऱ्याने घातला महिलांना गंडा, फसवणूक झालेल्या महिलांना घेवून शिवसेनेच्या महिला आघाडीने केली धुलाई

X

मुद्रा लोन मिळवून देते असे आमिष दाखवून अनेक महिलांना गंडा घालणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शमीम बानो या महिलेला शिवसेना महिला आघाडी आणि फसगत झालेल्या महिलांनी मिळून चोप दिला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून शमीम बानो हिला ताब्यात घेऊन कल्याण न्यायालयात हजर केले. कल्याण न्यायालयाने शमीम बानो हिला २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, कल्याणमध्ये राहणाऱ्या शमीम बानो या स्टॅम्प वेंडरचं काम करतात. त्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी सुद्धा आहेत. राजकारणात असल्याने अनेक महिला त्यांना भेटण्यासाठी येत असतात. या महिलांना मुद्रा लोन मिळून देण्याचे आमिष दाखवून शमीम यांनी अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकारी आशा रसाळ व फसवणूक झालेल्या महिलांनी केला आहे.Updated : 25 Feb 2021 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top