Home > Political > केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याविरुद्ध हक्कभंग, काँग्रेस मांडणार प्रस्ताव

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याविरुद्ध हक्कभंग, काँग्रेस मांडणार प्रस्ताव

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याविरुद्ध हक्कभंग, काँग्रेस मांडणार प्रस्ताव
X

देशात कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे उत्तर केंद्र सरकारने संसदेत दिले आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी आरोग्य विभाला या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना देशातल्या राज्य सरकारांनी केंद्राला पाठवलेल्या रेकॉर्डमध्ये ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला आहे अशी नोंद केलेली नाही, असे उत्तर देण्यात आले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात Pegausu प्रकरणावरुन सरकारची कोंडी झाली असताना आता या मुद्द्यावरुनही काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती देणाऱ्या आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्याविरुद्ध काँग्रेसने हक्कभंग आणण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोणत्याही राज्य किंवा केंद्र प्रदेशाने ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिलेली नाही, असे उत्तर पवार यांनी दिले होते. केंद्र सरकारच्या या उत्तराने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन, "सिर्फ़ ऑक्सीजन की ही कमी नहीं थी। संवेदनशीलता व सत्य की भारी कमी- तब भी थी, आज भी है।" असा टोला लगावला आहे.

Updated : 21 July 2021 6:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top