Home > Political > कॉंग्रेसची मोठी घोषणा: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के महिलांना तिकिट - प्रियंका गाधी

कॉंग्रेसची मोठी घोषणा: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के महिलांना तिकिट - प्रियंका गाधी

कॉंग्रेसची मोठी घोषणा: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के महिलांना तिकिट - प्रियंका गाधी
X

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के महिलांना देणार असल्याची घोषणा आज प्रियंका गांधी यांनी केली. त्यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली. यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के तिकीट महिलांना देणार असून हा निर्णय उत्तरप्रदेशात बदल हवा असणाऱ्या सर्व महिलांसाठी आहे. उत्तर प्रदेश मध्ये बदलाचे स्वप्न आता पूर्ण होईल. यासाठी महिलांनी पुढे यावे. महिलांनी स्वतःचे संरक्षण करावे. माझा निर्णय उत्तरप्रदेशच्या प्रत्येक महिलेसाठी अल्याच प्रियंका गांधी म्हणाल्या.

सध्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशाची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने 'लडकी हू लड सकती हु' हा नारा देत प्रियांका गांधी यांनी महिलांना विधानसभा निवडणुकीत 40 टक्के तिकीट देणार असल्याची घोषणा केली.

Updated : 19 Oct 2021 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top