Home > Political > "ये आदमी पागल तो नही होग या!",म्हणत अलका लांबा यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका…

"ये आदमी पागल तो नही होग या!",म्हणत अलका लांबा यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका…

ये आदमी पागल तो नही होग या!,म्हणत अलका लांबा यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका…
X

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन Union Budget 2022 भरलं आहे. या अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प सादर होत असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा त्यांच्या नाकपुड्या साफ करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या त्यांच्या व्हिडीओवर आता समाजमाध्यामांवर विविध प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. अशातच काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी अमित शहांवर पागल तर नाही झालात अशी टीका केली आहे.

देशाचं नव्या वर्षाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन भरलं आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 74 वा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या नाकपूड्या साफ करत होते नेमकं कॅमेऱ्याने हे टिपलं आणि अधिवेशनाचं थेट प्रसारण होत असल्याने लाखो लोकांनी ते टीव्ही वर लाइव्ह पाहिलं. काहींनी ही दृष्ये स्वतःच्या मोबाइलमध्ये टिपली आणि ती सोशल मिडीयावर अपलोड केली. दिवसभरात हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ विमर्श जैन नावाच्य़ा युजरने ट्विट केला होता. त्याच्या या व्हिडीओला कोट करत काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ये आदमी पागल तो नही हो गया छीं | असं ट्विट केलं आहे. यातील पागल हा शब्द त्यांनी पंजाबी मध्ये टाइप केला आहे. त्यांच्या या ट्विटला 11 हजार लाइक्स मिळाल्या असून 300 वेळा रीटिव्ट केला गेला आहे तर 87 जणांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोण आहेत अलका लांबा?

अलका लांबा या दिल्ली काँग्रेसच्या महिला नेत्या आहेत. सुरवातीच्या काळात आधी २ वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी 2015 ते 2019 या काळात त्या दिल्ली विधानसभेच्या सदस्य देखील राहिल्या आहेत. मात्र त्यांनी आपचा राजीनामा देत पून्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सध्या काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत.

Updated : 1 Feb 2022 1:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top