Home > Political > कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव विजयी..

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव विजयी..

कोल्हापुरात उत्तर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव विजयी..
X

कोल्हापुरात उत्तर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.


कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी 92 हजार 226 इतकी मते मिळवत त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांना पराभूत केले आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक जोरदार रंगली होती. खरतर या निवडणुकीत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रचारासाठी कोल्हापुरात भाजप व महाविकास आघाडीच्या अनेक मोठया नेत्यांनी हजेरी लावली होती.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती. तर भाजपने नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली होती.

जयश्री जाधव यांनी सत्यजित कदम यांच्यावर 18 हजारहून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. भाजपच्या सत्यजित जाधव यांना 77 हजार 426 इतकी मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून जयश्री जाधव यांची आघाडी होती शेवच्या 26 व्या फेरीअखेर त्यांनी 92 हजार 226 इतकी मते मिळवत त्यांनी मोठा विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांच्या विजयाचा जल्लोष आता कोल्हापूरात करण्यास सुरुवात झाली आहे.

Updated : 16 April 2022 10:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top