Home > Political > राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांची उमेदवारी जाहीर

राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांची उमेदवारी जाहीर

राजीव सातव यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाला संधी मिळणार? याची चर्चा अनेक दिवसांपासून चालू होती. काँग्रेसकडून या जागेसाठी रजनी पाटील यांच्या नावाची आता घोषणा झाली आहे.

राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील यांची उमेदवारी जाहीर
X

काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यानंतर राजीव सातव यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या जागेवर राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना तिकीट दिले जाईल अस म्हंटले जात होते. तशी मागणी देखील मोठ्या प्रमाणावर होत होती. पण काँग्रेसने या जागेसाठी माजी खासदार रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.

राजीव सातव हे काँगेसचे नेते राहुल गांधी यांचे खूप निकटवर्तीय होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाच राज्यसभेची संधी मिळेल असे सर्वांना वाटत होते. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी दिल्लीत जाऊन काँगेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट देखील घेतली होती. त्यांनी तशी इच्छा देखील व्यक्त केली होती. तसेच राज्यातील काँगेस नेत्यांच्याही त्यांनी मध्यंतरी गाठीभेटी घेतल्या होत्या. काँगेस कुटुंब तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा शब्द काँगेस नेते राहूल गांधी यांनी त्या वेळी त्यांना दिला होता. मात्र, शेवटी उमेदवारी जी आहे ती रजनी पाटील यांना देण्यात आली आहे. रजनी पाटील या बीडच्या माजी लोकसभा खासदार असून राज्यसभेच्याही त्या एक वेळा खासदार राहिल्या आहेत.

Updated : 21 Sep 2021 5:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top