- चित्रा वाघ यांचा भाजपने वापर करून घेतला का?
- यूएस कॉन्सुल जनरल म्हणून माईक हॅन्की मुंबईत रुजू
- अपक्ष व शिंदे गटात नाराजी?
- Lawasa Case : सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटूंबियांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका..
- मंत्रिमंडळात कोणत्या महिलांचा होणार समावेश..
- ''शिंदे-फडणवीसांच्या आया-बहिणी..'' रुपाली ठोंबरे भडकल्या
- मिर्ले धनगरवाडी घटनेवर चिमुरडीने लिहील होतं पंतप्रधानांना पत्र
- ''संजय राऊत व शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते'' प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट
- देश २०१४ ला स्वातंत्र्य झाला मग अमृत महोत्सव कोणता..?- अमोल मिटकरी
- तेजस ठाकरे शिवसेनेचा नवा चेहरा ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सभागृहात 'जय श्रीराम' च्या घोषणा..'
X
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सरकारला आज विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. यावेळी राहुल नार्वेकर यांना 165 तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली. त्यानंतर या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केलं.
अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांची निवड झाला असल्याचे उपाध्यक्षांनी सांगताच सभागृहात जय श्रीराम, भरत माता की जय अशी मोठी घोषणाबाजी झाली. त्यानंतर राजन साळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच सोबत अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पाटोले यांनी त्यांना अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेण्यात आले.