Home > Political > उर्मिला मातोंडकर रोमिओ सोबत डेटवर; नेटकरी संतापले

उर्मिला मातोंडकर रोमिओ सोबत डेटवर; नेटकरी संतापले

उर्मिला मातोंडकर रोमिओ सोबत डेटवर; नेटकरी संतापले
X

महाराष्ट्रात राजकीय वातावरणात अनेक उलाढाली चालल्या आहेत .एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले . परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला .एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली . या घडामोडींमुळे महाविकास आघाडीला तर फटका बसला आहे, पण शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे शिवसेना पक्षाला अजून धोका वाढला आहे.

दरम्यान अभिनेत्री आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या उर्मिला मातोंडकर यांनी रविवारी एक ट्विट केलं आहे. त्यांनी 'कॉफी डेट विथ रोमिओ' असं लिहून आपला आणि आपल्या कुत्र्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्यात शिवसेना पक्ष सत्तांतराच्या लढतीत झुंज देत असताना उर्मिला मातोंडकरांच्या या ट्विटवर नेटकरी नाराज असल्याचे दिसून येत आहे.काहींनी त्यांचं कौतुक केलं आहे .पण बऱ्याच नेटकऱ्यांनी सध्याची परिस्थिती दाखवत समाजाप्रती त्यांची भूमिका जाणवून दिल्याचे सुद्धा दिसत आहेत..








Updated : 4 July 2022 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top