Home > Political > चित्रा वाघ यांची चारच शब्दात प्रतिकिया...

चित्रा वाघ यांची चारच शब्दात प्रतिकिया...

चित्रा वाघ यांची चारच शब्दात प्रतिकिया...
X

राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज आता राजकीय विश्लेषक सुद्धा बांधू शकत नाही आहेत. राज्यात वारंवार राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारचे नवीन राजकीय नाट्य काल आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. आपणा सर्वांना माहित आहे तीन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. या महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्षात फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा मोठा गट घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होतात न होतात तोपर्यंत पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळाला. यावरच राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अगदी चारच शब्दात त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे..

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही क्षणातच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यावेळी विशेष म्हणजे अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते सुद्धा सहभागी झाले आणि त्यांनी सुद्धा मंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल अशा शरद पवार यांच्या निकटवर्तीय समजले जाणाऱ्या नेत्यांची सुद्धा नावे समोर आली. राज्यात या सगळ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादी पक्षातूनच बाहेर पडत भाजपसोबत गेलेल्या चित्रा वाघ यांनी सुद्धा अगदी प्रतिक्रिया दिली आहे चित्रा वाघ यांनी काय म्हटला आहे ते देखील आपण पाहुयात..

तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले आहे या ट्विटमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे या चौघांचा फोटो शेअर केला आहे. हे चार फोटो टाकत चित्रा वाघ यांनी ''योग्य वेळी योग्य निर्णय'' असं कॅप्शन दिले आहे. आता चित्रा वाघ यांनी हे ट्विट केलं खरं पण त्यांच्या या ट्विटवर आलेल्या कमेंट्स पाहिल्या तर अनेकांनी त्यामध्ये आपली वेगवेगळी मते नोंदवली आहेत. त्यांच्या या ट्विटच्या कमेंट्स मध्ये अजित पवार किंवा इतर अन्य नेत्यांपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ वारंवार पाहायला मिळत आहे. नक्की हा व्हिडिओ काय आहे? लोकांनी काय मत व्यक्त केले आहेत? हे पाहण्यासाठी तुम्ही त्यांचं ही ट्विट पाहू शकता...

Updated : 3 July 2023 9:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top