Home > Political > "शिवसेनेत घेतलं नाही म्हणून चित्रा वाघ यांची आगपाखड,"; शिवसेना नेत्याकडून गौप्यस्फोट

"शिवसेनेत घेतलं नाही म्हणून चित्रा वाघ यांची आगपाखड,"; शिवसेना नेत्याकडून गौप्यस्फोट

शिवसेनेत घेतलं नाही म्हणून चित्रा वाघ यांची आगपाखड,; शिवसेना नेत्याकडून गौप्यस्फोट
X

गेल्या काही दिवसांपासून सतत शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला. म्हणूनच त्या शिवसेनेवर आगपाखड करत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केला. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली.

मनिषा कायंदे यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, "चित्रा वाघ यांची नेमकी पोटदुखी काय आहे ? असं आहे की, चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला. म्हणून त्या शिवसेनेवर आगपाखड करत आहेत. त्यांनी आपलं काही झाकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा हा आटापीटा चालला आहे," अशी खोचक टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.

चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून सतत शिवसेनेवर टीका करत आहेत,तर सोनियासेनेचे प्रवक्ते म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख करत आहेत. शिवसेनेला बीफच समर्थन करावे लागत असल्याचे सुद्धा चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.त्यामुळे त्यांचा आरोपला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी उत्तर दिले आहे.

Updated : 5 Aug 2021 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top