Latest News
Home > Political > राज्यात मोगलाई अवतरलीये; औरंगाबादच्या सामुहिक बलात्काराच्या घटनेवरून चित्रा वाघ संतापल्या

राज्यात मोगलाई अवतरलीये; औरंगाबादच्या सामुहिक बलात्काराच्या घटनेवरून चित्रा वाघ संतापल्या

राज्यात मोगलाई अवतरलीये; औरंगाबादच्या सामुहिक बलात्काराच्या घटनेवरून चित्रा वाघ संतापल्या
X

औरंगाबाद जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. मध्यरात्री औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला चढवला. मात्र, या वेळी या ठिकाणी असलेल्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटनासमोर आली आहे. तर या घटनेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर संताप व्यक्त टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "औरंगाबाद जिल्हात 7 दरोडेखोरांचा चाकू कु-हाडीचा धाक दाखवत १५ दिवसांची ओली बाळंतीण व ८ महिने गरोदर महिलेवर सामुहीक बलात्कार, राज्यात मोगलाई अवतरलीये रोज दरोडे बलात्कार होताहेत जराही लाज शिल्लक असेल तर नामांतर राहू दे पण निदान सुरक्षितता तरी प्रदान करा," असं म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केली.

काय आहे प्रकरण....

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजेच्या सुमारास 7-8 दरोडेखोरांनी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मगरे वस्तीवर हल्ला चढवला. सुरवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा दाख दाखवण्यात आला. त्यांनतर त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी 25 हजारांचा मुद्देमालासह रक्कम चोरीला गेली आहे.

कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण

यावेळी दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. त्यातील एकाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. विशेष म्हणजे यातील एक पीडित महिलेला पाच ते आठ महिन्यांचे लहान बाळ आहे.

आधी दारू पिले...

दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी आधी वस्तीच्या बाजूला असलेल्या एका शेतात मनसोक्त दारू पिली. त्यांनतर त्यांनी वस्तीवर हल्ला चढवला. दारूच्या नशेत त्यांनी आधी मारहाण केली, त्यांनतर त्यातील चौघांनी दोन महिलांवर बलात्कार केला.

Updated : 20 Oct 2021 12:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top