Home > Political > 'हिसाब बराबर होंगा'; आमदारांच्या निलंबनावरून चित्र वाघ संतापल्या

'हिसाब बराबर होंगा'; आमदारांच्या निलंबनावरून चित्र वाघ संतापल्या

हिसाब बराबर होंगा; आमदारांच्या निलंबनावरून चित्र वाघ संतापल्या
X

ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभेत मांडत असताना, विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे भाजपच्या 12 आमदारांच एक वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत, 'हिसाब बराबर होंगा' असा टोला लगावला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, 'संविधान बचावचे नारे देणारेचं संविधानाच, लोकशाहीचा गळा घोटत आहेत. ठाकरे सरकारने १२ जणांचं निलंबन करून मुस्कटदाबी चालवलीये, त्यामुळे राज्याच्या जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल, कारण ते जनतेचा आवाज सभागृहात उठवतं होते. त्यामुळे लक्षात ठेवा,हर एक का दिन आता है...हिसाब बराबर होगा,असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला.


तर, मला आई बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या. असा आरोप तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. हा प्रस्ताव मांडताना छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ओबीसी आरक्षण जाण्याला भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. छगन भुजबळ यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी गोंधळ घातला.

Updated : 5 July 2021 1:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top