Home > Political > राज्यातील कायदा सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघाल्याचे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, चित्रा वाघ यांचा घणाघात

राज्यातील कायदा सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघाल्याचे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, चित्रा वाघ यांचा घणाघात

राज्यातील कायदा सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघाल्याचे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते,  चित्रा वाघ यांचा घणाघात
X

राज्यात खून, बलात्कार आणि मुलींच्या अपहरणाच्या अनेक घटना घडत आहेत. राज्यातील कायदा सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघाल्याचे आपण यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. पोलिसांचा धाक राहिला नसून पोलीस हे ठाकरे सरकारच्या दावनीला बांधले गेले आहेत, असा घणाघात भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पंढरपुरात केला. चित्रा वाघ यांनी पंढरपूर येथील पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. दिवसा ढवळ्या महिला आणि मुलींवर लैगिंक अत्याचार होत आहेत.

अशा वाढत्या घटनांमुळे राज्यातील लेकी बाळींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक शहरामध्ये व गावांमध्ये खून, अपहरण आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांमधील आरोपी मोकाट फिरत आहेत. निर्ढावलेल्या गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील कायद सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. कायदा सुव्यवस्था कधीही इतकी बिघडली नव्हती ती आता बिघडली आहे. पोलिस ठाकरे सरकारच्या दावनीला बांधले गेले आहेत. त्यामुळे अशा घटना वाढत असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

Updated : 2021-10-30T13:45:16+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top