Home > Political > 'यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणाऱ्यांना कदाचित...' चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

'यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणाऱ्यांना कदाचित...' चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणाऱ्यांना कदाचित... चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका
X

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 'रंगलेल्या गालाचा' मुका घेणारा पक्ष आहे', अशी टीका विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यांनतर राष्ट्रवादीकडून सुद्धा प्रतिउत्तर दिले जात आहे. तर यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना, 'मी याविषयी काहीही बोलणार नाही. माझ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या याच वक्तव्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.

यशवंतराव चव्हाण यांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्यांनी आजपर्यंत रामोशी समाजाला कधीच कोणतेही प्रतिनिधित्व दिलेलं नाही. ज्यावेळी यशवंतराव चव्हाण होते त्यावेळी त्यांनी विधानपरिषदेवरती त्यांनी एकाची नियुक्ती केली होती. पण त्या वसा वारस्याला आता कदाचित विसर पडला असेल म्हणून त्यांना ह्या टीका आता टोचतात, अशी अप्रत्यक्ष टीका चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्यात की, प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. तसेच, काही जन थोबाड आणि गाल रंगवू म्हणतात, त्यामुळे नक्कीच थोबाड फोडायली पाहिजे पण ती बलात्कारी आणि तुमच्या पक्षात असलेले काही असेच ज्यांच्यावर एफआयआर झाली आहेत. आणि त्यासाठी तुम्ही कमी पडत असाल तर आम्हाला बोलवा आम्ही यायल तयार असल्याचा टोला सुद्धा चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना लगावला.

Updated : 14 Sep 2021 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top