- पी. टी. उषा होणार खासदार..
- Breaking the trend : माजी IMF मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या भिंतीवर गीता गोपीनाथ यांचा फोटो सामील.
- शहाजीबापू यांच्या पेक्षा त्यांच्या पत्नीने मारलेला डायलॉग एकदम ओके..
- सातारा-प्रतापगड-कुंभरोशी रस्ता दरड कोसळल्याने पूर्णपणे बंद...
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर स्लीपिंग पॉड्सची सुविधा...
- VIDEO - राजापूरला पुराचा वेढा...
- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री..
- कॉन्डोम कंपनीच्या आलीया व रणबीरला अनोख्या शुभेच्छा..
- म्हणून एकाच कुटुंबातील 9 जणांनी केली हत्या, अखेर गूढ उलगडलं..
- #MaharashtraPoliticalCrisis ; एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय?

"रश्मीताई तुमचे कार्यकारी....," सामनातील अग्रलेखावरून चित्रा वाघ संतापल्या
X
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचा सामनातील अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील महिलांबाबतची असणाऱ्या तालीबानी प्रवृतीचं उदाहरण आहे असा घणाघात वाघ यांनी केला आहे.
यावेळी बोलताना वाघ पुढे म्हणाल्या की, 'अहो राऊत एका महिलेवरती अमानवीय अत्याचार झालेला आहे, त्यामुळे तिचा ज्या यातनेने मृत्यू झाला असेल तुम्हाला ते या जन्मातही समजणार नाही.' अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तिचा वापर करता आणि महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशची तुलना करता, असा टोला वाघ यांनी लगावला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की, नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झालेला आहे. फक्त भावनिक गप्पा झोडायच्या आणि मग घटनेनंतर म्हणायचे ताई, घाबरू नका..चिंता करू नका…हल्लेखोरांना शिक्षा होईल.. आणि फक्त अशी भावनिक भुरळ घालायची.. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राऊत यांना सुनावले आहे. सोबतच संजय राऊत, तुम्ही मुंबई सिपी केंव्हापासून झालात?असा सवाल करत चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की,तपास पुर्ण व्हायच्या आधीच संजय राऊत यांनी आपल्या अग्रेलखातून अत्याचार करणारा 'एकच' नराधम होता असे घोषीत केले. ही धडपड कुणाला वाचवण्यासाठी? की ही विकृती? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
संजय राऊतांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील महिलांबाबतची असणाऱ्या तालीबानी प्रवृतीचं उदाहरण आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 13, 2021
मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरेंना विचारायचयं की तुमचे कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करताहेत pic.twitter.com/1LHF0OECi0
सोबतच 'मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरे यांना हेच विचारायचे आहे की तुमचे कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी,अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करताहेत,अशा तालीबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार?'असा सवाल चित्रा वाघ यांनी रश्मी ठाकरे यांना केला आहे.