Home > Political > मुलींवर अत्याचार करणार्यांवर तुमचा हा जोर दाखवा इथे नाही - चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मुलींवर अत्याचार करणार्यांवर तुमचा हा जोर दाखवा इथे नाही - चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

वाह रे तुमचा पुरोगामीपणा, सोमय्या यांच्या अटकेचे आदेश हे मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी असल्याच चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.

मुलींवर अत्याचार करणार्यांवर तुमचा हा जोर दाखवा इथे नाही - चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
X

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या कोल्हापूरला निघाले असताना, त्यांना पोलिसांनी पहाटे कराडमध्ये उतरवले. आता सोमय्या कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत आहेत. काल मुंबई मधून ते कोल्हापूरला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेस ने निघाले होते. त्यावेळी त्यांना अनेक ठिकाणी पोलिसांनी अडवणूक केली . किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाचे तसे आदेश देखील दिले होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यासंदर्भात नोटीस दिली होती.

या सगळ्या प्रकरणावरून भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ती निशाणा साधला आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करत म्हंटल आहे की, वाह रे तुमचा पुरोगामीपणा…

मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी किरीट सोमय्या जीं च्या अटकेचे आदेश….मुख्यमंत्री महोदय जी महिला मुलींवर अत्याचार करणार्यांवर तुमचा हा जोर दाखवा इथे नाही….

तुमच्या या ॲक्शन ने खात्री झाली कोल्हापूरमें दाल जरूर काली है…किरीटजी हम आपके साथ है अस म्हंटल आहे.

Updated : 20 Sep 2021 5:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top