Home > Political > आस्तीनच्या सापांना ओळखा, चित्रा वाघ यांचा थेट उद्धव ठाकरे यांना सल्ला

आस्तीनच्या सापांना ओळखा, चित्रा वाघ यांचा थेट उद्धव ठाकरे यांना सल्ला

आस्तीनच्या सापांना ओळखा, चित्रा वाघ यांचा थेट उद्धव ठाकरे यांना सल्ला
X


समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर संजय राऊत यांनी केलेल्या टिपण्णीवरून चित्रा वाघ यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर संजय राऊत यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या महामार्गाला शापित महामार्ग असे म्हटले होते. त्यावरून चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटले की, तुमची मनं इतकी संवेदनशील बनली आहेत की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला तुम्ही शापित म्हणत आहेत. उद्धव जी सर्वज्ञानी संजय राऊत तुमच्या वडिलांचं नाव आणि ओळख पुसायला निघाले आहेत. त्यामुळे आता तरी अशा आस्तीनच्या सापांना ओळखा. अशा नमक हरामांना पोसणारे आणि बाळासाहेबांचा अपमान खपवून घेणारे तुम्ही एकमेव सुपूत्र आहात. त्यामुळे उद्धव ठाकरे आतातरी शुद्धीवर या, असा सल्ला चित्रा वाघ यांनी दिला आहे.

Updated : 2 July 2023 5:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top