Home > Political > "..तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल" - कायदेतज्ज्ञ उल्लास बापट

"..तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल" - कायदेतज्ज्ञ उल्लास बापट

..तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल - कायदेतज्ज्ञ उल्लास बापट
X

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांनी बंड केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापल आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेला परिस्थितीमुळे शिवसेनेने 16 जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना येत्या 48 उत्तर देण्याचे सांगितले आहे.जर हे 16 आमदार 48 तासात आले नाही तर उपसभापती या आमदारांना निलंबित करू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे.अस घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटल आहे. सत्र चालु झाले आणि तिथे समजा अविश्वासाचा ठराव मांडला आणि तो संमत झाला तर त्याचा अर्थ उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल. मग तिथे सगळे नाटक संपते. आणि दुसरा कोणी तरी येईल. जर दुसरं कोणी तयार झाले नाही किंवा बहुमत आले नाही तर ६ महिन्याकरिता राष्ट्रपती राजवट येते. या ६ महिन्यामध्ये निवडणुक आयोगोलो निवडणुक घ्यावी लागते. असे कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले.



Updated : 26 Jun 2022 12:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top