Home > Political > भाजपच्या महिला आमदारांची फसवणूक करणारा ताब्यात...

भाजपच्या महिला आमदारांची फसवणूक करणारा ताब्यात...

भाजपच्या महिला आमदारांची फसवणूक करणारा ताब्यात...
X

भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती ही घटना पुण्यात घडली होती. हाय प्रोफाइल केस असल्याने पुणे पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवत अवघ्या काही दिवसांतच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणी पुण्यात सायबर पोलिस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो बिबेवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. आज आरोपीला औरंगबाद येथून अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मुकेश राठोड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सुनीता क्षीरसागर यांना पुणे पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतलं आहे. सुनीता आणि मुकेश हे दोघेही शेतकरी कुटुंबातील असून खर्चासाठी पैसे लागत असल्याने या दोघांनी मिळून चार आमदारांना खोटं सांगून पैसे घेतले.

माझी आई बाणेर येथे हॉस्पिटलमध्ये आहे मला काही पैसांची गरज आहे तुम्ही मला 3 हजार 400 रुपय ऑनलाइन पाठव अशी बतावणी करून भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून पैसे मागून घेतले. मात्र हीच घटना आपल्या सहकारी महिला आमदार श्वेता महाले, मेघना बोर्डीकर आणि देवयानी फरांदे यांचा सोबत देखील घडल्याचे समोर आल्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांनी तक्रार दाखल केली होती.

या दोघांनी अजून कोणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास बिबवेवाडी पोलीस करत असून दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये आज हजर केले जाणार आहे

Updated : 21 July 2022 1:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top