Latest News
Home > Political > "इस देश के है हमारी भी गिनती करो" म्हणत पंकजा मुंडेंनी केली OBC जनगणनेची मागणी

"इस देश के है हमारी भी गिनती करो" म्हणत पंकजा मुंडेंनी केली OBC जनगणनेची मागणी

इस देश के है हमारी भी गिनती करो म्हणत पंकजा मुंडेंनी केली OBC जनगणनेची मागणी
X

पंकजा मुंडे यांनी OBC समाजाची जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणीवजा आठवण केंद्र सरकारला करून दिली आहे. ही आठवण करून देताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या संसदेतील भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 'आम्ही देखील या देशातील आहोत, आमची गणना करा... ओबीसी जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता... काही आठवणी काही वचने', असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

देशाची 16 वी जनगणना 2021 मध्ये होणार असून ही जनगणना मोबाइल अॅपवरून होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असल्याची याआधी माहिती दिली आहे. जनगणनेला एप्रिल किंवा मे महिन्यात सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.


Updated : 24 Jan 2021 9:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top