Home > Political > सरपंच ते केंद्रीयमंत्री रक्षा खडसेंचा प्रवास

सरपंच ते केंद्रीयमंत्री रक्षा खडसेंचा प्रवास

सरपंच ते केंद्रीयमंत्री रक्षा खडसेंचा प्रवास
X

भाजपच्या खासदार रक्षा खडसे तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदार संघातून पाऊणे तीन लाख मताधिक्यने निवडून आल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा पराभव केला. रक्षा खडसे ह्या भाजप नेते एकनाथ खडसेंच्या सून आहेत खडसेंच्याच सल्ल्याने रक्षा निखिल खडसे यांनी वयाच्या 22 व्या वर्षीचं राजकारणात एंट्री केली.

सरपंच ते केंद्रीयमंत्री असा आहे प्रवास

रक्षा खडसेंनी सासरे एकनाथ खडसेंच्या पाऊलावर पाऊल टाकत 2010 मध्ये भारतीय जनता पक्षात काम सुरू केला. 2010 मध्येच झालेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामंपचातीच्या निवडणुकीत त्या सदस्य म्हणून विजयी झाल्या. यानंतर 14 सप्टेंबर 2010 ते 29 फेब्रुवारी 2012 पर्यंत त्यांनी सरपंचपदाचा कारभार सांभाळला.

2012 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत चांगदेव- रुईखेडा गटातून त्यांनी विजय मिळवला. जिल्हा परिषदेवर भाजप ची सत्ता आल्याने पाहिल्याच टर्म मध्ये 2 एप्रिल 2012 ते 23 मे 2014 पर्यंत त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापती म्हणून कामकाज पाहिले.

त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत पहिल्यादा निवडून आल्या. 2019 मध्येही मोदींच्या करिष्म्याने दुसऱ्यांदा मोठया मताधिक्याने निवडून आल्या. आणि 2024 मध्ये भाजपची राज्यात पीछेहाट होत असतांना रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे या तिसऱ्यांदा विजयी झाल्या.

अवघ्या 14 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत 37 वर्षीय रक्षा खडसे यांनी सरपंचपदापासून ते आता केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे . महाराष्ट्रातून पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या महिलांमधून समावेश होणाऱ्या रक्षा खडसे एकमेव आहेत.

Updated : 10 Jun 2024 4:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top