Home > Political > "संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही.." चित्रा वाघ संतापल्या....

"संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही.." चित्रा वाघ संतापल्या....

संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही.. चित्रा वाघ संतापल्या....
X

राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार अखेर मंगळवारी पार पडला. पण या मंत्रिमंडळ विस्तारावर आता भाजपमधून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेतल्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते. पण पूजा राठोडच्या मृत्यू प्रकरणी राठोड यांच्यावर आरोप झाले. त्यात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून दूर केले होते.

पण उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या शिंदे गटात सहभागी असलेल्या संजय राठोड यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे, "

पुजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे

@CMOMaharashtra

असे ट्विट त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला टॅग करत केले आहे. भाजपच्या एक महिला नेत्याने आरोपीला मंत्रिपद दिले गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे, यामुळे भाजपच्या नैतिकतेच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Updated : 9 Aug 2022 6:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top