Latest News
Home > Political > खड्यांच्या मुद्यावरून भाजपकडून सुप्रिया सुळेंवर टीका

खड्यांच्या मुद्यावरून भाजपकडून सुप्रिया सुळेंवर टीका

खड्यांच्या मुद्यावरून भाजपकडून सुप्रिया सुळेंवर टीका
X

राज्यात गेळ्यावेळी भाजपची सत्ता असतांना त्यावेळच्या विरोधीपक्षात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी 'सेल्फी विथ खड्डा' अशी मोहीम राबवत सत्ताधारी पक्षाला कैचीत पकडण्याचे काम केले होते. मात्र आता सत्तेत येताच राज्यातील अनेक रस्त्यांची चाळणी झाली असतांना सुप्रिया सुळे यांना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का? असा अप्रत्यक्षरित्या टीका भाजपकडून करण्यात येत आहे.

भाजप मुंबई या ट्वीटर अकाऊंटवरून खड्ड्याचा सेल्फी घेतानाचा सुप्रिया सुळे यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. तर सोबतच, मुंबई-ठाण्यात सेल्फी विथ खड्डे मोहिमेला प्रचंड वाव आहे. फक्त त्यासाठी थोड्या प्रमाणिकपणाची गरज आहे. जमेल का?, असा खोचक टोलाही लगावन्यात आला आहे.

भाजप सरकारच्या काळात जिथे जाईल तिथे रस्त्यावरच्या खडड्यांचा सेल्फी काढून सोशल मीडियावर सुप्रिया सुळे ह्या फोटो पोस्ट करायच्या. विशेष म्हणजे ट्वीटमध्ये त्या तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही टॅग करून सरकारवर हल्लाबोल करायच्या. आज भाजपकडून त्याच 'सेल्फी विथ खड्डा' मोहिमेची सुप्रिया सुळे यांना आठवण करून देण्यात आली.

Updated : 27 Sep 2021 10:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top