Home > Political > महिला अत्याचारांच्या घटनांवर 'भाजप महिला' नेत्यांच मौन?

महिला अत्याचारांच्या घटनांवर 'भाजप महिला' नेत्यांच मौन?

महिला अत्याचारांच्या घटनांवर भाजप महिला नेत्यांच मौन?
X

नवी दिल्ली: उत्तरप्रदेश मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ( UP PANCHAYAT 2021 ) भाजपकडून हिंसाचार करण्यात आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या हिंसाचारावरून योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहेत. एका फोटोमध्ये महिलेची भर रस्त्यात साडी ओढली जात आहे. त्यामुळे देशभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. मात्र असे असताना भाजपच्या महत्वाच्या महिला नेत्या महिला सुरक्षेच्या मुद्यावर मौन बाळगून आहे.

उत्तरप्रदेश येथे महिला अत्याचाराच्या घटना काही थांबायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी चंदौली जिल्ह्यातील बर्थरा गावात दलित महिलेच्या घराला आग लावली होती. त्यांनतर आता महिलेची भर रस्त्यात साडी ओढली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटनेवरून सर्वच क्षेत्रातून निषेध केला जात आहे.

पण असं असताना भाजपच्या राष्ट्रीय नेत्या मंत्री स्मृती इराणी ( Smriti Irani) , निर्मला सीतारमण (nirmala sitharaman) आणि भाजप महिला मोर्च्याच्या प्रमुख वनाथी श्रीनिवासन (vanathi srinivasan) ह्या उत्तरप्रदेश मधील महिला अत्याचारांच्या घटनेवर बोलायला तयार नाहीत. जून महिन्यात ममता बनर्जी (mamata banerjee) यांच्यावर महिला अत्याचाराच्या मुद्यावरून टीका करणाऱ्या स्मृती इराणी (Smriti Irani) आता उत्तरप्रदेश मधील घटनांवर का बोलत नाही? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.

राज्यातील भाजप नेत्यांची सुद्धा चुप्पी...

भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांप्रमाणे राज्यातील भाजप नेत्या सुद्धा उत्तरप्रदेशमधील महिला अत्याचाराच्या घटनांवर बोलायला तयार नाहीत. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी सुद्धा उत्तरप्रदेशमधील महिला अत्याचाराच्या घटनांवर न बोलणे पसंद केले आहे. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिलेल्या भाजप नेत्या विजया राहाटकर (vijay rahatkar) यांनी सुद्धा अजून तरी महिला अत्याचाराच्या घटनेवर कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही.

Updated : 10 July 2021 10:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top