Home > Political > 'मोदी पेट्रोलच्या किंमत कमी करण्यासाठी नव्हे तर, अयोध्यात राम मंदिर बनवण्यासाठी आलेत';भाजपच्या महिला प्रवक्त्याचा दावा

'मोदी पेट्रोलच्या किंमत कमी करण्यासाठी नव्हे तर, अयोध्यात राम मंदिर बनवण्यासाठी आलेत';भाजपच्या महिला प्रवक्त्याचा दावा

मोदी पेट्रोलच्या किंमत कमी करण्यासाठी नव्हे तर, अयोध्यात राम मंदिर बनवण्यासाठी आलेत;भाजपच्या महिला प्रवक्त्याचा दावा
X

देशातील बर्‍याच राज्यात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या वर गेली आहे. तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असून महागाईमुळे जनता होरपळून निघत आहे. असं असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमत कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला जागतिक नेते बनवण्यासाठी आले असल्याचा, दावा भाजपच्या दिल्लीतील प्रवक्त्या सारिका जैन यांनी केला आहे.

सारिका यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हंटल आहे की, कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमत कमी करण्यासाठी मोदी आले नसून, भारताला जागतिक नेते बनवण्यासाठी आले आहेत. तसेच तीन तलाक कायदा, कलम ३७० रद्द करण्यासाठी आणि अयोध्यात राम मंदिर बनवण्यासाठी आले आहेत, असेही सारिका जैन यांनी म्हंटल आहे. नेमकं काय म्हणाल्यात सारिका, पाहू यात...


Updated : 3 July 2021 6:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top