Home > Political > भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण

भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण

सासरे एकनाथ खडसे नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 चार महिन्यांत तिन वेळा पॉझिटिव्ह..

भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण
X

रावेर च्या भाजप खासदार रक्षा खडसे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्याला कोरोना झाल्याचं खुद्द रक्षा खडसे यांनी ट्विट द्वारे सांगितलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असंही त्यांनी ट्विट म्हटलं आहे.

रक्षा खडसे यांचे सासरे आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील त्यांना कोरोना झाल्याचं जाहीर केलं आहे.

एकनाथ खडसे चार महिन्यांत तिन वेळा पॉझिटिव्ह

1) एकनाथ खडसे यांनी 19 नोव्हेंबर 2020 रोजी ट्वीट करत आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं जाहिर केलं होतं.

2) 30 डिसेंबर 2020 रोजी ED कार्यालयात चौकशीला जाण्याच्या दिवशी खडसेंनी ट्वीट केलं. त्यात कोरोना सदृष्य लक्षणे आढल्याचं म्हटलं होतं.

3) आज 18 फेब्रुवारी 2021 ला आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं तिसरं ट्वीट एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

दरम्यान रक्षा खडसे यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत.

Updated : 18 Feb 2021 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top