Home > Political > सासऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपच्या पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे यांची दांडी

सासऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपच्या पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे यांची दांडी

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशानंतर पक्ष संघटना भक्कम करण्यासाठी जिल्हा कार्यकारिणीचीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गिरीश महाजन ही उपस्थित होते.

सासऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपच्या पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे यांची दांडी
X

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता गृहित धरून जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीच्या वतीने आज दुपारी पक्ष कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी करण्यात आली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजप खासदार रक्षा खडसे या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान, भाजप कोअर कमिटीच्या वतीने तातडीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष आदींची उपस्थिती होती. पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीनं वरिष्ठ नेत्यांकडून या बैठकीत चाचपणी करण्यात आली.

Updated : 27 Oct 2020 10:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top