Home > Political > "शिवसेना घरात,काँग्रेस कोमात आणि राष्ट्रवादी बिर्याणीच्या प्रेमात"

"शिवसेना घरात,काँग्रेस कोमात आणि राष्ट्रवादी बिर्याणीच्या प्रेमात"

शिवसेना घरात,काँग्रेस कोमात आणि राष्ट्रवादी बिर्याणीच्या प्रेमात
X

परवा रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.लोकांच्या घरात पाणी शिरले असल्याने अनेकांना बचाव कार्यच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे. मात्र असे असताना सत्ताधारी पक्षाचे लोकं घरात बसून असल्याचा आरोप भाजप आमदार श्वेता महाले यांनी केला आहे. तर शिवसेना घरात,काँग्रेस कोमात आणि राष्ट्रवादी बिर्याणीच्या प्रेमात असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

श्वेता महाले यांनी ट्विट करता म्हंटले आहे की,"कोकणातील जनता पूरात अडकवलेली असताना विरोधी पक्षाचे नेते कोकणाकडे धावले आहेत पण मुख्यमंत्री, मंत्री घरात बसून आहे. आघाडीचे काही नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त आहेत. जनता वाचवायचा विषय आहे म्हणून हे निवांत आहेत,विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते",असा टोला महाले यांनी लगावला.






तसेच, "शिवसेना घरात, काँग्रेस कोमात आणि राष्ट्रवादी बिर्याणीच्या प्रेमात. अशात जनतेला धीर देण्याची जबाबदारी विरोधी पक्षालाच निभावावी लागत" असल्याचं सुद्धा श्वेता महाले म्हणल्यात.




कोकणातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते. तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण,रायगड जिल्ह्यातील कर्जत व महाड भागाला अधिक फटका बसला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोरातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. मात्र प्रशासनाने वेगवान हालचाली करत लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी गुडघ्याभर पाण्यातून जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला,तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा केल्या.

Updated : 23 July 2021 2:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top