Home > Political > आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ 'संकटमोचक' गिरीश महाजन यांच्या पत्नी रस्त्यावर

आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ 'संकटमोचक' गिरीश महाजन यांच्या पत्नी रस्त्यावर

आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ संकटमोचक गिरीश महाजन यांच्या पत्नी रस्त्यावर
X

जळगाव: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचा दिवशी विरोधकांनी घातलेल्या प्रचंड गोंधळ आणि विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घातलेल्या राड्यानंतर भाजप (bjp) च्या 12 आमदारांच निलंबन करण्यात आले. त्यानंतर निलंबनाच्या कारवाई विरोधात राज्यभरात भाजपकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केली जात आहे. तर जामनेरात माजी मंत्री आणि भाजप आमदार गिरीश महाजन ( girish mahajan ) यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

साधना महाजन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या आंदोलनात जामनेर तालुक्यतील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करा, अशीही मागणी करण्यात आली.

भाजप आमदारांचे चुकीच्या पद्धतीने निलंबन करण्यात आले आहे, ते त्वरित रद्द करण्यात यावे. जर निलंबन मागे घेतले नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी साधना महाजन यांनी दिला. तसेच त्यांनी यावेळी आघाडी सरकारवर जोरदार टीका सुद्धा केली.

फडणवीस सरकार असताना भाजपचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांची ओळख होती. सरकार गेल्यानंतर सुद्धा ते पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात पुढे असतात. सोमवारी विधानसभेत निलंबित झालेल्या आमदारांमध्ये महाजन यांचाही समावेश आहे.

Updated : 6 July 2021 10:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top