Home > Political > पंकजाताई कार्यकर्त्यांच्या जिवाचा विचार करा

पंकजाताई कार्यकर्त्यांच्या जिवाचा विचार करा

OBC समाजाच्या आरक्षणासाठी भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात आलं. पुण्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं पण या आंदोलनात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. उद्या जर या कार्यकर्त्यांपैकी एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?

पंकजाताई कार्यकर्त्यांच्या जिवाचा विचार करा
X

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने हळूहळू सर्व व्यवहार सुरु होत आहेत. त्यातच कोरोनाचा 'डेल्टा प्लस' हा नवीन व्हेरीयंट सापडल्याने व राज्यात या विषाणूचे रुग्ण देखील आढळल्याने तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची चिंता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचायचे असेल तर सोशल डिस्टंन्सिग पाळणं, मास्क वापरणं, व नियमीत हात धुण्याचं आवाहन प्रशासन करत आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधीच हे सर्व नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत.

OBC आरक्षणाच्या मुद्यावरुन आज राजकीय पक्षांनी, विविध संघटनांनी राज्यभर आंदोलन केलं. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने एक हजार ठिकाणी आंदोलन केल्याचा दावा केला आहे. तर कॉंग्रेसकडूनही काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. पण या आंदोलनात ना सोशल डिस्टंसींगचं पालन करण्यात आलं नाही. विशेष म्हणजे अनेक नेते या आंदोलनाला मास्क न लावताच आंदोलन करत होते.

जेव्हा एखादी व्यक्ती 'नेता' बनते. तेव्हा त्या वक्तीला फॉलो करणारा मोठा वर्ग असतो. ही लोक आपला नेता जे काही सांगेल ते करायला तयार असतात. आपल्या नेत्याची स्टाइल, बोलण्यातील लकब, त्यांचं सार्वजनीक जिवनातील वर्तन ते कॉपी करत असतात. या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधींना माहिती नसतात अशातला विषय नाही, पण आचरणात कोण आणणार?

भाजपने एक हजार ठिकाणी आंदोलन केलं. कार्यकर्त्यांची गर्दी जमवली नेत्यांनी मोठमोठ्याने भाषणं केली. पण हेच नेते मास्क लावायला विसरले. राज्यात रुग्ण संख्या वाढू लागली की फक्त सरकारवर टीका करण्यापेक्षा काही नियम विरोधी पक्षानेही पाळले तर त्याचे जनतेवर सकारात्मक परिणाम होतील.

पुण्यात मोर्चाचं नेतृत्व पंकजा मुंडे करत होत्या. त्यांच्या आजूबाजूला त्यांचे अनेक कार्यकर्ते होते. घोषणा द्यायला सुरुवात झाली आणि पंकजा मुंडेंनी घातलेलं मास्क काढलं. आणि घोषणांचा जोर वाढला. जसा जसा घोषणांचा जोर वाढला त्या प्रमाणे मास्क काढणाऱ्या लोकांची संख्या वाढली.

पंकजा मुंडे या एक जबाबदार, संवेदनशील राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांना दिवंगत गोपिनाथ मुंडे यांचा वारसा लाभलेला आहे. गोपिनाथ मुंडे कार्यकर्त्यांची काळजी जीवापाड करत, त्यांनी एक एक कार्यकर्ता जोडला. त्यामुळंचं शेटजी भटजीचा पक्ष गावा गावापर्यंत पोहोचला.

'पंकजा ताई तुम्ही फक्त नेत्या नाही तर एका 'लोक नेत्या'ची कन्या देखील आहेत. त्यामुळे गोपिनाथ मुंडे यांनी जसा अगोदर कार्यकर्त्यांचा विचार केला तसा तुम्ही सुध्दा अगोदर कार्यकर्त्यांच्या जिवाचा विचार कराल हीच अपेक्षा..'

बर हा बेजबाबदारपणा फक्त विरोधीपक्ष करतोय असं नाही. सरकार फक्त आपल्याच जिवावर चाललंय अशा अविर्भावात असलेल्या कॉंग्रेस पक्षाचे नेतेही नियम पाळताना दिसत नाहीत.

बरं तुम्ही हे आंदोलन खरंच जनतेसाठी केलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण इथं तुम्ही आरक्षणाचं राजकारण करुन स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहात. जर समजा तुमच्या बेजबाबदारपणामुळे उद्या एखाद्या कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाली आणि त्याच्या जिवाच काही बरंवाईट झालं तर त्याच्या संपुर्ण परिवाराची जबाबदारी तुम्ही घेणार का?

आज तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते 'तुम्ही म्हणाल तसं' करत आहेत. पण तुमची बेशीस्त बघणारी जनता मात्र "या नेत्यांना अक्कल नाही का?" म्हणतेय.

उद्या जर या कार्यकर्त्यांपैकी एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? त्यामुळे आज 'जो पत्ता करतो गुल्ल' म्हणत तुमचा उदोउदो करतात त्या कार्यकर्त्यांच्या जिवाचा विचार करा राजकारण्यांनी केला तर बरं होईल.

Updated : 26 Jun 2021 2:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top